

देशात कोरोनानं धुमाकूळ घातला आहे. रिकव्हरी रेट जरी चांगला असला तरी रोज वाढणाऱ्या रुग्णांची संख्या चिंतेची बाब आहे. आशा परिस्थितीत सरकारनं कोरोनाच्या काही गाइडलाइन्स पर्यटनासाठी देखील जारी केल्या आहेत. अनलॉक झाल्यानंतर आता घरी बसून कंटाळलेले नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत.


टिहर गढवाल इथे टिहरी झील परिसरात पर्यटकांची तुफान गर्दी झाली आहे. पर्यटनादरम्यान बोट व्यावसायिकांचा निष्काळजीपणा खूप महागात पडू शकतो. बोटिंगला जाण्याआधी थर्मल स्क्रिनिंग आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. मात्र या सर्व नियमांना केराची टोपली दाखवल्याचं या फोटोमधून दिसत आहे.


या फोटोमध्ये आपण पाहू शकता की अनेक लोक मास्क लावण्याच्या नियमांना देखील बगल देत आहेत. भारतात कोरोनाची दुसरी लाट तर विदेशात तिसरी लाट आली आहे. दिल्लीसह उत्तरेतील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं नाइट कर्फ्यू देखील लावण्यात आला आहे.


कोरोनाचा विषाणूचा धोका वाढत्या थंडीसोबत तीव्र होण्याचा धोका आहे. टिहरी लेकमध्ये बोटिंग पॉइंटवर कोणतंही स्क्रिनिंग न करता आणि सोशल डिस्टन्सिंग न बाळगता पर्यटक जात आहेत. त्यांना देखील कोरोनाची भीती वाटत नाही का हे हा फोटो पाहून वाटत आहे.