भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 8 दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या 1 हजारांपेक्षा कमी झालीय. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 60 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. देशातल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या ही 1,08,334 एवढी झाली आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही देशात जास्त असून भारत जगात पहिल्या स्थानावर आहे. देशात सर्वाधिक रुग्ण संख्या असणाऱ्या 5 राज्यांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 54.3 टक्के एवढी आहे. भारतात कोरोनामुक्तीचा दर हा 86.17 एवढा आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ही 60,77,976 एवढी झाली आहे.