Home » photogallery » national » THE NUMBER OF CORONA PATIENT DEATHS IN THE COUNTRY IS OVER 1 LAKH INDIA RANKS THIRD IN THE WORLD MHAK
देशात कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या 1 लाखांच्यावर, जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर
अमेरिकेत सर्वात जास्त 2 लाख 12,861 आणि ब्राझिलमध्ये 1 लाख 44,767 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
|
1/ 7
देशात कोरोनाचा प्रकोप अजुनही सुरूच आहे. दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचे आणि मृत्यूचे आकडे वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
2/ 7
शुक्रवारी सकाळपर्यंत देशात 99 हजार 773 रुग्णांचा मृत्यू झाला. तर एकट्या महाराष्ट्रात दिवसभरात 424 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूने 1 लाखांचा टप्पा पार केला आहे.
3/ 7
कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत अमेरिका आणि ब्राझिलनंतर भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
4/ 7
देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 64 लाखांच्यावर गेली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
5/ 7
अमेरिकेत सर्वात जास्त 2 लाख 12,861 आणि ब्राझिलमध्ये 1 लाख 44,767 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
6/ 7
शुक्रवारी महाराष्ट्रात 424 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या ही 37 हजार 480 एवढी झाली आहे.
7/ 7
तर दिवसभरात 15,591 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 14 लाख 16 हजार 513 एवढी झाली आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.