2003 मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या काळात या पुलाचे काम सुरू झाले होते, त्यावेळी माननीय मुख्यमंत्री नितीश कुमार मंत्री होते. गेल्या 19 वर्षात मोठ्या उलथापालथीनंतर हे काम आता पूर्णत्वास जात आहे. त्यामुळं आता 25 डिसेंबर रोजी अटलजींच्या जयंतीदिनी या पुलाचे उद्घाटन करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे.
हा प्रकल्प सुमारे 19 वर्षांपासून रखडल्याने त्याची किंमत जवळपास तिप्पट वाढली आहे. यापूर्वी हा खर्च सुमारे 921 कोटी रुपये होता, तो वाढून सुमारे 2774 कोटी रुपये झाला आहे. हा गंगा रेल्वे-कम-रोड प्रकल्प पूर्ण झाल्यावर बेगुसराय आणि खगरिया हे अंतर मुंगेरपेक्षा खूपच कमी होईल. मुंगेर ते खगरिया आणि बेगुसराय हा प्रवास काही मिनिटांत पूर्ण होईल.