उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे येथे लग्नाच्या काही वेळापूर्वी नवरदेवाने वरात आणणार नसल्याचं सांगितलं. नवरदेवाने नवरीला मोबाइलवर मेसेज केला, ज्यामध्ये लिहिलं होतं की, लग्न रद्द झाले आहे. आता ते वरात घेऊन येणार नाहीत. हा मेसेज वाचून नवरीला धक्काच बसला. मुलीने घरातल्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी नवरदेवाच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.
जेव्हा पुष्पलता ब्युटी पार्लरमध्ये तयारी करीत होती, तेव्हा तिच्या मोबाइलवर मेसेज आला. हा नवरदेवाचा होता. ज्यात त्याने लिहिलं होतं की, तो वरात घेऊन येत नाही. हा मेसेज वाचून नवरीच्या पायाखालची जमीन सरकली. तिने कुटुंबीयांना याबाबत सांगितलं. ज्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेलं. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनां नवरीने सांगितलं, मुलाकडील मंडळींना हुंडा न दिल्याने लग्न रद्द केलं.