घातपाताच्या तयारीत होते तिघे पाकिस्तानी; भारतीय जवानांनी वेळीच हेरून घातलं कंठस्नान
काश्मीर सीमेजवळ उरी इथून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांना (3 Pakistani terrorist killed) भारतीय जवानांनी ठार केलं. त्यांच्याकडून शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. पाहा PHOTO
जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) नियंत्रण रेषेजवळ (Line of Control) काही घुसखोर लपल्याची माहिती भारतीय लष्कराला (India Army) मिळाली होती. त्यानंतर आपल्या जवानांनी छापा मारून तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे.
2/ 5
या चकमकीत लष्कराच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं असून ते पाकिस्तानी असल्याचं निष्पन्न झालं आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रं आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
3/ 5
हे दहशतवादी काश्मीर खोऱ्यात उरीजवळ (Uri attack) नियंत्रण रेषाचा ओलांडून भारतात घुसण्याच्या तयारीत होते. पाकव्याप्त काश्मीरमधून ते भारतीय हद्दीत आले होते.
4/ 5
ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून पाच AK-47, आठ पिस्तूल आणि 70 ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर काही पाकिस्तानी रुपयेही जप्त करण्यात आले आहेत.
5/ 5
जम्मू -काश्मीरमधील दहशतवाद संपवण्यासाठी सुरक्षा दल आणि पोलिसांकडून मोहीम राबवली जात आहे. शोपियानमध्ये बुधवारी रात्री सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केलं.