बिहारमध्ये दबदबा असणाऱ्या लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाचा शैक्षणिक आढावा आपण घेणार आहोत. महागठबंधनचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणारे तेजस्वी यादव यांचे नववी पर्यंत शिक्षण झाले आहे. तर त्यांचे मोठे भाऊ असणारे तेज प्रताप यादव बारावीपर्यंत शिकले आहेत. त्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता, मात्र नापास झाल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडले.
लालू यादव यांना 7 मुली आहेत, त्यापैकी मीसा भारती या राजकारणात सक्रीय आहेत. इतर सहा मुली सार्वजनिक कार्यक्रमात दिसून येत नाहीत. मीसा भारती आरजेडीच्या राज्यसभा खासदार आहेत. त्यांनी MBBS चे शिक्षण पूर्ण केले आहे. महाविद्यालयीन टॉपर असून देखील त्यांनी प्रॅक्टिस केली नाही. कोट्यवधींची संपत्ती असणाऱ्या मीसा भारती यांचे शैलेंद्र कुमार यांच्याशी लग्न झाले आहे.