COVID-19: हा आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाचा सगळ्यात जास्त धोका, टेस्ट करण्याचा डॉक्टरांचा सल्ला
देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 33 लाखांच्या वर गेली आहे.
|
1/ 8
कोरोना व्हायरसचं थैमान अजुनही सुरुच आहे. देशातल्या रुग्णांच्या संख्येने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जेष्ठ आणि वयोवृद्ध नागरीकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असला तरी इतर काही आजार असलेल्यांनाही सर्वात जास्त धोका असल्यांच आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
2/ 8
टी.बी.चा आजार असलेल्या नागरीकांना कोरोनाचा दुप्पट धोका असल्याचा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.
3/ 8
अशा रुग्णांनी आपला आहार पौष्टिक राहिल याची काळजी घ्यावी असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
4/ 8
कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येत जवळपास 5 टक्के रुग्ण हे टी.बी.चा आजार असलेले होते.
5/ 8
त्यामुळे टीबी असलेल्या सर्व रुग्णांची कोरोना चाचणी करावी असाही सल्ला देण्यात आला आहे.
6/ 8
गेल्या काही दिवसांमध्ये देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला असून दररोज 60 ते 70 हजारांच्या नव्या रुग्णांची भर पडत आहे.
7/ 8
देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 33 लाखांच्या वर गेली आहे.
8/ 8
तर कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 25 लाखांच्या वरगेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.