कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बराच काळ लोक घरी होते. याच दरम्यान लोकांनी केलेले जुगाड, त्यांच्यातील कलाकृती आणि भन्नाट आयडीया सोशल मीडियाद्वारे जगासमोर आल्या. आतापर्यंत तांदूळ, नारळ, खडू यांवर कोरीव काम केलेलं पाहिलं असेल पण सुपारीवर कोरीव काम करण्याची कला एका तरुणाला अवगत आहे.