लोकसभा निवडणूक 2019मध्ये भाजप कडून गुरुदासपूर मतदार संघातून उमेदवारी मिळालेल्या अभिनेता सनी देओल यांचा आज बठिंडा येथे रोड शो केला. योवळी त्यांच्या सोबत भाजप खासदार हरसिमरत कौर बादल या उपस्थित होत्या.
2/ 9
सनी देओलचा हा रोड शो बठिंडाच्या फायर ब्रिगेड चौक ते मार्केट आणि पुन्हा फायर ब्रिगेड चौक या मार्गावर झाला.
3/ 9
सनी देओल यांनी 23 एप्रलिला निर्मला सीतारमण, पियूष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. नवी दिल्लीत भाजप मुख्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला.
4/ 9
यापूर्वी भाजपचे दिवंगत नेते विनोद खन्ना यांनी गुरुदासपूरमधून जागेवरून निवडणूक लढवली होती. या जागी आता सनी देओलला उमेदवारी देण्यात आली आहे.
5/ 9
सनी देओल आणि हरसिमरत कौर बादल यांचं या रोड शोमध्ये जंगी स्वागत करण्यात आले अनेक ठिकाणी लोक फुलं घेऊन उभे होते. तर अनेकांनी सनी देओल सोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती.
6/ 9
'घायल', 'दामिनी', 'डर', 'बॉर्डर', 'गदर', 'क्रोध', 'आग का गोला', 'हिम्मत', 'फर्ज', 'ये रास्ते हैं प्यार के', अर्जुन पंडित, 'जो बोले सो निहाल' आणि 'बिग ब्रदर' या सिनेमांसह यशस्वी बॉलिवूड करिअर नंतर सनी देओल आता राजकारणात उतरला आहे.
7/ 9
सनी देओल हा धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांचा मोठा मुलगा आहे. तर धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी या मथुरा येथून भाजपच्या खासदार आहेत.
8/ 9
रोड शो दरम्यान जनतेला अभिवादन करताना सनी देओल आणि हरसिमरत कौर बादल
9/ 9
सनी देओल आणि हरसिमरत कौर बादल यांच्या रोड शो पाहिल्यावर सनीच्या चाहत्यांना त्याच्या 'गदर' सिनेमातील 'मैं निकला गड्डी ले के...' या गाण्याची आठवण आल्याशिवाय राहिली नाही.