

देहरादून: फेब्रुवारीमध्ये देहरादून मध्ये सुट्टीसाठी आलेला एक युवक लॉकडाऊनमुळे परत मलेशियाला परतू शकला नाही. मात्र आता त्याला त्याठिकाणी परतायचेही नाही. 2 महिन्यांपासून याठिकाणच्या डोंगराळ भागात फिरल्यानंतर त्याने मित्रांबरोबर एक स्टार्टअप सुरू केले आहे. आणि त्यांचे हे 'गोड' उत्पादन मोठ्या प्रमाणात विकले जात आहे.


देहरादून याठिकाणचे असणारे प्रवीण काला मालदीव, ओमानमधील एका 5 स्टार हॉटेलमध्ये काम करत होते. परदेशात कोरोनाचे संक्रमण वाढल्यानंतर ते भारतात आले होते. मात्र मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर ते पुन्हा तिकडे परतू शकले नाहीत.


नोकरी गेल्यानंतर त्यांनी उत्तराखंडमध्येच नोकरी करण्याचे ठरवले. सुट्ट्यांच्या काळात त्यांनी मित्राबरोबर उत्तराखंडमधील पहाडी भागात फिरण्याचे ठरवले.


याठिकाणी बनणाऱ्या मधाची मार्केटिंग करण्याची कल्पना त्यांना सुचली आणि आता हिच मध त्यांच्या उत्पन्नाचे साधन बनली आहे.


यामध्ये प्रवीण यांना त्यांचे मित्र रमण शैली यांनी मदत केली. त्यांनी पहाडी प्रोडक्ट्सच्या विक्रीसाठी एक पिंटू नावाचे app बनवले आहे. याच माध्यमातून प्रवीण यांनी देखील मध विकण्यास सुरुवात केली.