Home » photogallery » national » SRI RAM VAN GAMAN CIRCUIT SCHEME CHHATTISGARH KOREA TO SUKMA TRAVELED 2260 KM TO DARSHAN LORD SHRI RAMA CHANDKHURI KAUSHALYA TEMPLE MHAS
Ram Van Gaman Paripath : कोरियापासून सुकमापर्यंत 2260 किलोमीटरच्या प्रवासात होणार प्रभू श्रीरामांचं दर्शन; पाहा PHOTOS
श्रीरामचंद्र ज्या ज्या ठिकाणी गेले त्यांना जोडून श्रीराम वन गमन परिपाठ योजना छत्तीसगढ राज्याच्या पुढाकाराने होत आहे. छत्तीसगढ म्हणजे रामाचं आजोळ, कौसल्या मातेचं माहेर याच भागात होतं असं मानलं जातं. पाहा PHOTOS
|
1/ 8
असं मानलं जातं की भगवान श्रीराम यांनी आपला वनवास छत्तीसगडमधील एका ऋषींच्या आश्रमात घालवला होता. त्याचे पुरावे हे लोककथा आणि पुराणांतही आढळतात. त्यामुळे आता छत्तीसगढ राज्य सरकार श्रीरामांच्या वास्तवाने पावन झालेल्या ठिकाणांचा विकास करण्याच्या विचारात आहे.
2/ 8
राम वन गमन सर्किट योजनेचा (Ram van gaman marg circuit scheme) औपचारिक शुभारंभ नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झाला. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांन या योजनेला हिरवा कंदिल दाखवला.
3/ 8
वनवासात श्रीराम यांनी छत्तीसगडमध्ये मोठा काळ घालवला होता. असं मानलं जातं की सीता आणि लक्ष्मण यांच्याह छत्तीसगड परिसरात श्रीराम 10 वर्षं होते.
4/ 8
राम वनगमन पथ या योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात कोरिया ते सुकमा पर्यंत 2260 किमी लांबीची 9 ठिकाणं विकसित करण्याचे काम चालू आहे. काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही सरकारकडून देण्यात आल्या आहेत.
5/ 8
राम वन गमन पर्यटन प्रकल्पामध्ये सीतामढी, हरचौका, रामगढ, शिवरिनारायण, तुर्तुरिया, चांदखुरी, राजिम, सिहावा सप्तर्षी आश्रम, जगदलपूर या ठिकाणांसाठी 1333 कोटी 55 लाख रुपये खर्च करून विकासकामे केली जात आहेत.
6/ 8
पहिल्या टप्प्यात चांदखुरी आणि राजिममध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सर्व सुविधा असतील. पर्यटकांना राहण्यासाठी व्यवस्था असेल.
7/ 8
या भागांमध्ये स्वच्छ पाण्याची सोय, बांधकाम, तलाव सुशोभीकरण, शौचालये, विश्रामगृहे आणि मधुबन धाममध्ये भूमिगत गटार बांधण्याचे काम होणार आहे. त्यामुळे या भागातील पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे.
8/ 8
श्रीरामाची आई कौसल्या मातेचं माहेर छत्तीसगढमध्ये होतं, असं मानलं जातं. त्यामुळे श्रीरामांचं बालपणही या परिसरात गेलं असल्याचं मानलं जातं.