समाजवादी पार्टीच्या उमेदवार पूनम सिन्हा यांनी लखनऊमधून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी लखनऊमध्ये मोठ्या रोड शोचं आयोजन केलं होतं.
2/ 18
या रोड शोवेळी पूनम सिन्हा यांचे पती अभिनेता शत्रुघ्न सिन्हा हे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादवदेखील उपस्थित होत्या.
3/ 18
या रोड शोवेळी लखनऊमध्ये समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
4/ 18
लखनऊमधून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या विरोधात पूनम सिन्हा यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
5/ 18
आपल्या पत्नीचा प्रचार करण्यासाठी नुकताच भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले अभिनेता आणि नेते शत्रुघ्न सिन्हा हे देखील उपस्थित होते. पुढे वाचा (लोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो)
6/ 18
लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या फेरीत १२ राज्यांतील ९५ जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदान करण्यासाठी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील मेगास्टारपासूनत ते सर्वसामान्य नागरिकांनी पोलिंग बूथवर गर्दी केले.
7/ 18
अनेक स्टार त्यांच्या चाहत्यांना आवर्जुन मतदान करण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. काहींनी तर त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केले.
8/ 18
दाक्षिणात्य अभिनेत्री आणि मॉडेल रेजिना कॅसेंड्रानेही तिचा हक्क बजावत आज चेन्नईत मतदान केलं. इन्स्टाग्रामवर आपला फोटो शेअर करताना तिने खास मेसेजही लिहिला.
9/ 18
तुमच्याकडे हक्क आहे आणि ही तुमची जबाबदारीही आहे. मतदान करण्याचा काय फायदा असा प्रश्न जे विचारतात त्यांच्यासाठी त्यांनी जबाबदारी घेणं शिकलं पाहिजे. जर आज तुम्ही मतदान केलं नाही तर उद्यावर बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही.
10/ 18
लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या फेरीत १२ राज्यांतील ९५ जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदान करण्यासाठी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील मेगास्टार पोलिंग बूथवर पोहोचले.
11/ 18
यात सर्वात आधी नाव घेता येईल ते म्हणजे सुपरस्टार रजनीकांत यांचं. गुरुवारी सकाळी ते पोलिंग बूथवर पोहोचले.
12/ 18
थलायवाने मध्य चेन्नई येथील जागेसाठी मतदान केलं. रजनीकांत यांनी स्टेला मॅरिस कॉलेजमध्ये तयार करण्यात आलेल्या बूथवर जाऊन मतदान केलं.
13/ 18
आपला मतदानाचा हक्क बजावताना रजनीकांत
14/ 18
रजनीकांत यांच्याशिवाय कमल हसन आणि त्यांनी मुलगी श्रुती हसनही मतदान करण्यासाठी रांगेत उभे होते
15/ 18
या दोन्ही स्टार्सनी स्टारडम न दाखवता रांगेत उभं राहून मतदान केलं. रांगेत शांतपणे उभे राहिल्याचे त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
16/ 18
दाक्षिणात्य अभिनेता विजयनेही यावेळी मतदान करत आपला हक्क बजावला.