George Fernandes : भारताच्या या माजी संरक्षण मंत्र्यांचे हे फोटो काही वेगळे फोटो पाहिले नसतील
कामगार नेते म्हणून सुरुवात करून देशाचे संरक्षण मंत्री झालेले ज्येष्ठ राजकीय नेते जॉर्ज फर्नांडिस यांचं मंगळवारी (29 जानेवारी) निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. संरक्षण मंत्री म्हणून आणि राजकीय धोरणी म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा अंदाज देणारे हे काही दुर्मीळ फोटो...
माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं मंगळवारी (29 जानेवारी) निधन झालं. सीमेवर भारतीय लष्करी तळांना नियमित भेट देणारे संरक्षण मंत्री म्हणून ते ओळखले जायचे.
2/ 15
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे NDA चे ते निमंत्रक होते. बंगालमध्ये तत्कालीन डाव्या सरकारच्या विरोधातल्या रॅलीत ममता बॅनर्जींशी हातमिळवणी करताना....
3/ 15
भारताचे संरक्षण मंत्री ज्यांनी फायटर जेटमधून प्रवास केला. हा 2003 सालचा पुण्याचा फोटो
4/ 15
मिग विमानातूनही जॉर्ज फर्नांडिस यांनी प्रवास केला होता.
5/ 15
सियाचीनचा हा भाग भारतीय लष्कराचा सर्वोच्च पातळीवरचा कँप आहे. अगदी टोकाच्या हवामानात सैनिक इथे तैनात असतात. या लष्करी तळाला भेट देणारे जॉर्ज फर्नांडिस पहिले संरक्षण मंत्री.
6/ 15
कारगिलमध्ये सीमेजवळ तैनात लष्करी सेनेच्या सज्जतेची पाहणी करताना तत्कालीन संरक्षण मंत्री
7/ 15
माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्यासमवेत एका मोकळ्या क्षणी टिपलेला हा फोटो.
8/ 15
चीनचे संरक्षणमंत्री General Cao Gangchuan यांचं भारतात स्वागत करताना तत्कालीन भारतीय संरक्षण मंत्री या नात्याने जॉर्ज फर्नांडिस
9/ 15
जनरल काओ गँगशुआन या चिनी संरक्षण मंत्र्यांबरोबर
10/ 15
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या NDA सरकारमधले जॉर्ज हे विश्वासू मंत्री.
11/ 15
NDA चा जाहीरनामा भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या समवेत सादर करताना
12/ 15
रशियन संरक्षण मंत्री आयगर सर्जेव्ह यांच्यासमवेत चर्चा करण्यासाठी जॉर्ज मॉस्कोला गेले होते.
13/ 15
फ्रान्सचे तत्कालीन पंतप्रधान जीन पिअरे रॅफ्रीन यांच्या समवेत चर्चा करताना जॉर्ज फर्नांडिस. एरो इंडिया शो बेंगळुरूमध्ये झाला होता. त्या वेळचा हा फोटो.
14/ 15
त्सुनामीनंतर उद्ध्वस्त झालेल्या किनारपट्टी भागाची पाहणी करून आल्यानंतर जॉर्ज फर्नांडिस यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती. त्या वेळचा हा फोटो.
15/ 15
रशियन बनावटीच्या मिग 21 विमानातून प्रवास केल्यानंतर कॉकपिटमधून अभिवादन करतानाचा हा 2013 चा फोटो.