माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी (Rajiv Gandhi Death Anniversary) आहे. या तारखेला 1991 मध्ये त्यांना बॉम्बस्फोटात आपला जीव गमवावा लागला होता. राजीव गांधींना मारण्याच्या उद्देशाने एलटीटीईने हा स्फोट घडवून आणला होता. त्या दिवशी राजीव यांचे पर्सनल सेक्रेटरी व्हिन्सेंट जॉर्ज यांनी सोनिया गांधींना या घटनेची माहिती दिली. सोनियांनी त्यांना एवढंच विचारलं, 'तो जिवंत आहे का?'... यानंतर 10 जनपथच्या भिंतींनी पहिल्यांदाच सोनिया गांधींच्या किंकाळ्या ऐकल्या. विव्हळलेल्या अवस्थेत सोनियांचे रडणे गेस्ट रूममध्ये उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्यालाही ऐकू येत होते, पण आता कोणीही काही करू शकत नव्हते.
1984 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला सर्वात मोठा विजय मिळाला. पण 1989 मध्ये पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवानंतर विजयाच्या इराद्याने राजीव गांधींनी प्रचारात पूर्ण ताकद लावली. जनतेला भेटण्यासाठी सुरक्षेकडेही दुर्लक्ष करू लागले. 21 मे 1991 रोजी राजीव तामिळनाडूतील श्रीपरंबदूर येथे निवडणूक प्रचारासाठी गेले होते. येथे ते आपल्या कारमधून खाली उतरले आणि अंगरक्षकांसह स्टेजच्या दिशेने निघाले. यादरम्यान त्यांनी तेथे उपस्थित सर्वसामान्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. पुन्हा एकदा त्यांनी सुरक्षेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली.
सकाळी 10 वाजले होते, राजीव गांधी त्यांच्या भाषणापूर्वी श्रीपरंमबुदूरमध्ये लोकांना भेटत होते, दरम्यान एक महिला त्यांच्या पायांना स्पर्श करण्यासाठी खाली वाकली आणि काही सेकंदात एक मोठा आवाज सर्वांचे कान सुन्न झाले. या स्फोटात राजीव गांधी जागीच ठार झाले. त्यांच्यासह अनेक लोकांचा मृत्यू झाला. आजूबाजूला रक्त आणि मांसाचे तुकडे पसरलेले होते.
ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक रशीद किडवई यांनी सोनिया गांधींवर लिहिलेल्या 'सोनिया: अ बायोग्राफी' या पुस्तकानुसार, घटनेच्या दिवशी राजीव गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थान 10 जनपथवर सर्व काही सामान्य होते. राजीव यांचे पर्सनल सेक्रेटरी व्हिन्सेंट जॉर्ज तेथून त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते, तेव्हा त्यांना फोन आला होता, ज्यामध्ये त्यांना राजीव गांधींसोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगण्यात आले होते. जॉर्जला विश्वास बसेना आणि लगेच 10 जनपथच्या दिशेने परत गेले. दरम्यान, सोनिया गांधी यांनाही फोन आला, त्यांना विचारण्यात आले की सर्व काही ठीक आहे का?
सोनिया गांधींनी ताबडतोब व्हिन्सेंट जॉर्ज यांना बोलावून घेतले. पण, त्यांना राजीव गांधींच्या हत्येची माहिती देण्याचे धाडस जमले नाही. जॉर्जचाही या बातमीवर विश्वास बसेना. दुसरा फोन व्हिसेंट जॉर्जला आला जो चेन्नईचा होता. फोन करणाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत सोनिया गांधी किंवा जॉर्ज यांच्याशी बोलायचे होते. जॉर्ज यांनी थेट राजीव गांधींबद्दल विचारलं. सुमारे पाच सेकंद समोरून काहीच प्रतिसाद आला नाही. जॉर्ज थांबले नाही, ते ओरडून विचारू लागले, ज्यावर त्या व्यक्तीने राजीव गांधी यांचा स्फोटात मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
फोन तसाच टाकत व्हिन्सेंट जॉर्ज सोनिया गांधींच्या खोलीकडे धावले. सोनिया त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या. जॉर्ज यांनी या स्फोटाबद्दल सांगितले ज्यात त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला 'तो जिवंत आहे का?' (ते जिवंत आहेत का?). सोनियांना समोरून मौनात उत्तर मिळाले. त्या ओरडत रडायला लागल्या. या अवस्थेत त्यांना कोणीही हाताळू शकले नाही. 10 जनपथच्या भिंतींनी सोनियांच्या किंकाळ्या ऐकण्याची ही पहिलीच वेळ होती. या हत्याकांडाची माहिती मिळताच काँग्रेस पक्षाचे नेते तेथे पोहोचू लागले.
राजीव गांधी यांच्या हत्येसाठी हा स्फोट एलटीटीईने आखला होता, असे नंतर उघड झाले. आत्मघातकी बॉम्बस्फोट करणाऱ्या महिलेचे नाव धनू असे होते. या गटाचा सदस्य असलेल्या LTTE प्रमुख प्रभाकरनच्या सांगण्यावरून शिवरासन याने हत्येचा संपूर्ण कट रचला होता. राजीव गांधी हत्या प्रकरणाची उकल करण्यासाठी सीबीआयच्या विशेष पथकाने कंबर कसली असतानाच एलटीटीई समर्थकांनी सायनाइट प्राशन करून आत्महत्या केल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. शिवरासन यानेही सायनाइट घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 26 जणांना न्यायालयात हजर करण्यात सीबीआयला यश आले. ज्यांच्यावर राजीव गांधी हत्येप्रकरणी खटला चालवण्यात आला होता.