

राजस्थानच्या एका गावात एक विचित्र घटना घडला. येथील अभयारण्य परिसरात एक महिला एका खडकाखाली दबली गेली होती. दिवाळीसाठी घराला माती लावण्यासाठी ही महिला गेली असता हा प्रकार घडला.


माती खोदताना एक दगड महिलेच्या अंगावर पडला आणि ती दबली गेली. दगडाखाली दाबून महिलेचे दोन्ही हात चिरडले गेले. महिलेने आरडाओरडा केला तेव्हा जवळपासच्या महिलांनी ग्रामस्थांना याबाबत सांगितले.


माहिती मिळताच पोलिस अधिकारी कैलासचंद बैरवाही घटनास्थळी पोहोचले. या महिलेला वाचविण्यासाठी गावकर्यांनी बचावकार्य सुरू केले, मात्र त्यांच्याकडे कोणताही मार्ग नव्हता. दगडाखाली दबलेली महिला वेदनेने विहळत होती.


हा परिसर ग्रामीण भाग असल्यामउळे घटनास्थळावर क्रेन किंवा जेसीबी मशीनही नव्हती. जोपर्यंत प्रशासन याची दखल घेतील, तोपर्यंत दगडाखाली दबलेल्या महिलेचा मृत्यू झाला असता. म्हणून गावकऱ्यांनी एकत्र जमून दगड हटवण्यास सुरुवात केली.


गावकऱ्यांनी दोन तास कष्ट घेतले आणि साखळीचा वापर करून महिलेची सुटका केली. ग्रामस्थांनी त्या महिलेला जिवंत बाहेर काढले. जखमी लाखो देवी यांना तातडीने करौली रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेच्या दोन्ही हात चिरडल्यामुळे त्यांना जयपूर येथे रेफर करण्यात आले.