मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » तपस्वी आणि पुजाऱ्याबाबतच्या त्या विधानानंतर राहुल गांधींनी कुरुक्षेत्रात ब्रह्म सरोवरावर केली आरती; पाहा PHOTOS
तपस्वी आणि पुजाऱ्याबाबतच्या त्या विधानानंतर राहुल गांधींनी कुरुक्षेत्रात ब्रह्म सरोवरावर केली आरती; पाहा PHOTOS
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'भारत जोडो यात्रा' रविवारी संध्याकाळी धर्मनगरी कुरुक्षेत्रात पोहोचली. यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी हरियाणातल्या कुरुक्षेत्रमधील ब्रह्म सरोवर येथे आरती केली. यावेळी ते तपस्वी अवतारामध्ये दिसले.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी हरियाणातल्या कुरुक्षेत्रमधील ब्रह्म सरोवर येथे आरती केली
2/ 7
राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या आरतीचा फोटो शेअर केला आहे
3/ 7
फोटोच्या कॅप्शनमध्ये राहुल गांधींनी लिहिलं, आज कुरुक्षेत्र येथे ब्रह्म सरोवराची आरती करण्याचे सौभाग्य लाभले.
4/ 7
भारताची प्रगती मनात ठेऊन, कल्पनेपलीकडच्या या नयनरम्य ठिकाणी नतमस्तक होतो! असंही पुढे त्यांनी लिहिलं.
5/ 7
कुरुक्षेत्रावरील राहुल गांधी यांचा तपस्वी लुक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे
6/ 7
याठिकाणच्या आरतीचे फोटो व्हायरल होत आहेत
7/ 7
पौराणिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ब्रह्म सरोवराविषयी अशी धारणा आहे की जेव्हा ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली तेव्हा हे त्यांचे मुख्य मंदिर होते. त्याला आदि सरोवर असेही म्हणतात.