PHOTO राहुल गांधींनी दान करण्यासाठी काढलेली ५००ची नोट परत ठेवली खिशात!
मध्य प्रदेशच्या निवडणुकांच्या पाश्वभूमीवर राहुल गांधी त्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ग्वाल्हेर इथे काँग्रेस सदस्यांसोबत त्यांनी गुरुद्वारामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. दानपेटीत टाकायला ५००ची नोट काढली आणि पेटीत न टाकताच खिशात परत टाकली. त्यांचे हे फोटो आता व्हायरल होताहेत.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी काय करतात, कुठे जातात याकडे नेहमीच विरोधकांचं लक्ष असतं. या वेळी त्यांचा हा फोटो चर्चेत अालाय. गुरुव्दाराच्या दानपेटीत 500 रुपये दान करण्यासाठी त्यांनी ५००ची नोट काढली खरी, पण त्यांनी ती नोट दान न करता परत खिशात ठेवली.
2/ 4
यावेळी राहुल गांधींबरोबर लोकसभा सदस्य कमलनाथ आणि खासदार ज्योतीरादित्य शिंदे हे देखील उपस्थित होते.
3/ 4
राहुल गांधी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. ग्वाल्हेर इथे मंगळवारी सकाळी गुरुव्दारातील पेटीत 500 ची नोट दान करण्यासाठी त्यांनी काढली आणि परत खिशात ठेवली याचा फोटो कुणीतरी काढला आणि तोच फोटो आता व्हायरल होतोय.
4/ 4
खासदार ज्योतीराज शिंदे यांनी राहुल गांधींना निवडणूक आचारसंहितेची आठवण करून दिली. राहुल यांच्या हे लक्षात येताच दानपेटीत टाकत असलेली नोट त्यांनी परत घेतली.