Bhagwant Mann's Wedding: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं झालं लग्न, लाल रंगाच्या पोशाखात दिसली नवरी, कपाळावरील गंधाचा आहे खास अर्थ
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी डॉ. गुरप्रीत कौर यांच्याशी लग्न (Bhagwant Mann wedding) केलं. या लग्नाचे फोटो आता समोर आले आहेत.
|
1/ 6
मुंबई, 7 जुलै : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी डॉ. गुरप्रीत कौर यांच्याशी लग्न (Bhagwant Mann wedding) केलं. मान यांचे हे दुसरे लग्न असून चंदीगडमधील त्यांच्या निवासस्थानी हे लग्न झाले. (Image: News18)
2/ 6
डॉ. गुरप्रीत कौर यांनी लग्नापूर्वी ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये भगवंत मान सोनेरी रंगाच्या शेरवानीमध्ये होते. मान यांनी लग्नामध्येही ही शेरवानी घातली होती. (Image: Twitter/News18)
3/ 6
भगवंत मान आणि गुरप्रीत कौर यांनी साधेपणे आणि मोजक्या मंडळीच्या उपस्थितीमध्ये हे लग्न केले. (Images : News18)
4/ 6
गुरप्रीत कौर यांनी यावेळी लाल रंगाचा खास पोशाख घातला होता. त्याचबरोबर खास गंध लावलं होतं. या गंधाला पिपल पत्ती असे म्हंटले जाते. पंजाबी संस्कृतीमधील लग्नाचा हा महत्त्वाचा भाग आहे. (Images : News18)
5/ 6
आम आदमी पक्षानं दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांंमधील काही मोजके पाहुणे या लग्नाला उपस्थित होते. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सहकुटुंब या लग्नाला हजेरी लावली. (News18)
6/ 6
गुरप्रीत कौर यांनी हरियाणातील खासगी विद्यापीठातून 2018 साली MBBS चे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना दोन बहिणी असून त्या दोघीही परदेशात स्थायिक झाल्या आहेत. (News18)