प्रियंका गांधी आजपासून 'गंगा यात्रे'वर; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
प्रियंका गांधी यांनी गुजरातमधून थेट नरेंद्र मोदींना आव्हान देत त्यांना लक्ष्य केलं आहे. त्यामुळं यंदाच्या निवडणुकीकडे आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.
राजकारणात सक्रिय झाल्यानंतर आता प्रियंका गांधी यांनी प्रचाराला जोरात सुरूवात केली आहे. त्यासाठी काँग्रेसनं देखील कंबर कसली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायाला मिळत आहे. प्रियंका यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
2/ 5
काँग्रेसनं आता 'साँची बात प्रियंका के साथ' अशी पोस्टर्स देखील उत्तर प्रदेशात लावली आहेत. आजपासून प्रियंका गांधी या गंगा यात्रा करणार आहेत.
3/ 5
आजपासून सुरू होणारी गंगा यात्रा 3 दिवस चालणार आहे. गंगा यात्रेदरम्यान प्रियंका 140 किमीचा प्रवास करणार असून लोकांशी देखील संवाद साधणार आहेत. त्यासाठी बोट देखील तयार करण्यात आली असून सुरक्षेची देखील काळजी घेण्यात आली आहे.
4/ 5
ठिकठिकाणी प्रियंका गांधी यांचे पोस्टर देखील लावण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पुर्ण ताकदीनं उतरल्यचं दिसत आहे.
5/ 5
प्रयागराज ते वाराणसी या दरम्यान ही गंगा यात्रा असणार आहे. यावेळी प्रियंका गांधी संगमावर पुजा देखील करणार आहेत.