भाजप अध्यक्ष अमित शहा हे एक दिवसाच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये होते. प्रयागराजच्या दौऱ्यावर असताना अमित शहा हे अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. अमित शहा सकाळी 11च्या सुमारास प्रयागराजला पोहचले. त्यानंतर ते गंगा नदीवर गेले. त्यांनी दिग्गज संताच्या समवेत गंगेचं दर्शन घेतलं आणि गंगा पूजा केली. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध हनुमान मंदिरात गेले. तिथे त्यांनी हनुमानाचं दर्शन घेतलं. हनुमानाचं दर्शन घेतल्यानंतर ते स्वामी अवधेशानंद गिरि महाराज यांची अमित शहा यांनी भेट घेतली आणि दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी महा गंगाआरती देखील केली. स्वामी अवधेशानंद गिरि महाराज यांच्या आश्रमामध्ये त्यांनी अनेक अध्यात्मिक गुरुंसोबत भोजनही केलं. त्यांनी गंगेमध्ये स्नान करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अमित शहांच्या या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी झोपलेल्या मारूतीचे दर्शन घेतले. त्यांच्या या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते.