Home » photogallery » national » PRANAB MUKHERJEE PASSES AWAY FORMER PRESIDENT OF INDIA NO MORE CONGRESS PROFILE OBITUARY PRANAB MUKHERJEE PHOTO
Pranab Mukherjee Passes Away: सच्चे काँग्रेसी ते राष्ट्रपती! 5 दशकांच्या राजकीय प्रवासात वाद झाले तरी राहिले तत्त्वनिष्ठ
भारताचे 13 वे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचं वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून ते रुग्णालयात होते.
|
1/ 14
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचं 84 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या दरम्यानच कोरोनाची लागणही त्यांना झाली.
2/ 14
पाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी व्ही. के. कृष्ण मेनन यांच्यासाठी प्रचार केला. इंदिरा गांधींनी त्यांना हेरलं आणि सक्रिय राजकारणात आणलं
3/ 14
इंदिरा गांधी यांचे विश्वासू म्हणून ते काँग्रेसमध्ये लवकरच वरच्या पदी पोहोचले. 1969 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आले.
4/ 14
प्रणब मुखर्जी यांनी 2012 ते 2017 पर्यंत राष्ट्रपती पद भूषवलं
5/ 14
इतिहास , राज्यशास्त्र , कायदा या क्षेत्रातलं पद्व्युत्तर शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं आणि अभ्यासू राजकारणी म्हणून त्यांची ख्याती होती.
6/ 14
इंदिरा गांधी यांच्या काळात प्रणब मुखर्जी अत्यंत महत्वाच्या पदांवर कार्यरत होते. 1982 मध्ये इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला.
7/ 14
परराष्ट्र मंत्री , संरक्षण मंत्री , वाणिज्य मंत्री आणि अर्थमंत्री म्हणूनही काम पाहिलं
8/ 14
देशाचे तेरावे राष्ट्रपती म्हणून 25 जुलै 2012 ला राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.
9/ 14
2019 मध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांचा गौरव करण्यात आला.
10/ 14
प्रणब मुखर्जी यांचं आत्मचरित्र गाजलं. ते संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानं वादंग निर्माण झाला होता.
11/ 14
प्रणव मुखर्जी वादळी व्यक्तिमत्त्व होतं. उत्कृष्ट संसदपटू होते. 23 वर्षं कॉंग्रेस कार्यकारिणीत सदस्य होते.
12/ 14
गाडगीळ- मुखर्जी फॉरम्युला नावाने ओळखल्या जाणाऱ्या नियोजन सूत्राचे ते शिल्पकार होते.
13/ 14
अतिशय विद्वान अशी ओळख असलेले मुखर्जी हे भारतीय राजकारणातले अतिशय मुरब्बी नेते आहेत.
14/ 14
राष्ट्रपती पदाचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी दिल्लीतच निवृत्तीचं आयुष्य सुरू केलं. नवी दिल्लीतल्या ल्युटियन्स भागातल्या 10 राजाजी मार्ग या सरकारी बंगल्यात त्यांचं वास्तव्य होतंं. माजी राष्ट्रपती अब्दुल कलामही याच बंगल्यात राहात होते.