Electricity from Waste : हे गाव तयार करतं कचऱ्यापासून वीज; पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक
तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील कांजीरंगल (Sivaganga district of Tamil Nadu) गावात वेस्टेज कचऱ्याच्या साहित्यापासून वीजनिर्मिती (Power generation) केली जात आहे. ऑगस्टमध्ये मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या गावाचे कौतुक केलं होतं.
या गावात कचऱ्यापासून तयार होते वीज. घरातला कचरा वाया जात नाही तर घर उजळवतो. पंतप्रधान मोदींनीही या गावच्या प्रकल्पाचं कौतुक केलं आहे.
2/ 4
तामिळनाडू राज्यातील कांजीरंगल गावात स्थानिक लोक आणि पंचायतींच्या मदतीने एनआरयूएम (NRUM) अंतर्गत उभारण्यात आलेल्या वीजनिर्मिती प्रकल्पापासून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती केली जात आहे.
3/ 4
हॉटेल आणि घरांमधून निघणारा ओला आणि सुक्या कचऱ्यावर (dry waste coming out of hotels and houses) या प्लांटमध्ये प्रक्रिया करून निर्माण केलेल्या वीजेचा वापर हा शेतीसाठी आणि इतर कामांसाठी केला जात आहे.
4/ 4
या प्लांटची क्षमता 2 टन आहे, त्यामुळे यातून निर्माण होणाऱ्या वीजेतून शेतीतील वीज वापरासह शेजारील परिसरात 200 रस्त्यांवरील दिवे लावण्यात आले आहेत. इतर जिल्ह्यांमध्येही असे प्लांट उभारण्याची मागणी आता होऊ लागली आहे.