पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला नागरिकांना देणार मोठी भेट, योजना झाली तयार!
देश आणि सर्व जगातच कोरोनाची साथ असल्याने पंतप्रधान आपल्या भाषणात काय सांगतात, धोरणांची कुठली दिशा स्पष्ट करतात यावरून पुढची वाटचाल कळणार आहे.
|
1/ 8
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 15 ऑगस्टच्या भाषणाकडे आता देशवासियांचं लक्ष लागलं आहे. लाल किल्ल्यावरून होणार असलेल्या या भाषणात मोदी काय घोषणा करतील याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
2/ 8
देशात सध्या कोरोनाचं संकट असल्याने सगळा देश कोरोनाशी दोन हात करत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी देशविसियांना आरोग्याशी संबंधित एक मोठी योजना भेट देण्याची शक्यता आहे.
3/ 8
दिल्लीत त्यासंबंधात ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ (NDHM)ची तयारी सुरु आहे. पंतप्रधान लाल किल्ल्यावरच्या त्यांच्या भाषणात या योजनेची घोषणा करण्याची शक्यता आहे.
4/ 8
या योजनेत देशातल्या सर्व नागरिकांच्या आरोग्याची माहिती गोळ करून त्यांना हेल्थ कार्ड देण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्याची आरोग्य योजनेशी सांगड घातली जाणार आहे.
5/ 8
ही योजना ऐच्छिक असून त्यात नाव नोंदविण्याची कुठलीही सक्ती नसणार आहे. ज्यांना इच्छा असेल त्या सगळ्यांना नाव नोंदविता येणार आहे.
6/ 8
यात नाव नोंदविणाऱ्यांचा हेल्थ डेटा राहणार असून टेलिमेडिसिन आणि इतर सुविधा मिळणार आहेत.
7/ 8
देशातल्या नागरिकांच्या आरोग्याचा डेटा उपलब्ध करणं, आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करणं, सेवांमध्ये पारदर्शकता आणणं आणि पायाभूत सुविधांची निर्मिती करणं हे या योजनेचे मुख्य उद्देश आहेत.
8/ 8
या माहितीच्या माध्यमातून देशाचं हेल्थ रजिस्टर निर्माण करण्याचाही सरकारचा हेतू आहे.