अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले मित्र आहेत. हाऊडी मोदी ते नमस्ते ट्रम्प कार्यक्रमापर्यंत संपूर्ण जगानं त्याची झलक पाहिली होती. याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे मित्र आणि एक महान नेते आहेत. ते खूप चांगलं काम करत आहेत. भारताला एक महान नेता आणि चांगली व्यक्ती मिळाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतही खूप चांगले संबंध आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मोदींना खास शुभेच्छासंदेश पाठवला आहे. मोदींच्या नेतृत्वामुळे भारत सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात विकासाच्या मार्गावर असल्याचंही त्यांनी उल्लेख केला आहे.