मोदींनी पायाभरणी केलेली संसदेची नवी इमारत असेल अशी असेल जुन्यापासून वेगळी
संसदेच्या नवीन इमारतीमध्ये भविष्याचा विचार करून संसद सदस्यांसाठी बैठक व्यवस्था वाढवण्यात आली असून आता एकाचवेळी 1224 सदस्य या इमारतीत बसू शकतील. त्याचबरोबर या नवीन संसद भवनात प्रत्येक खासदारासाठी 400 स्क्वेअर फुटाचे कार्यालय देखील असणार आहे. पाहूया जुन्या आणि नव्या संसद भवनात कोणते मोठे बदल आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल देशाच्या नवीन संसद भवनाच्या (New Parliament Building) इमारतीचे भूमीपूजन केले.या कार्यक्रमाला देशातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी आणि विविध देशांच्या राजदूतांनी हजेरी लावली होती. संसदेची ही नवीन चार मजली इमारत 64,500 चौरस मीटर क्षेत्रफळात बांधण्यात येणार असून 2022 पर्यंत या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.


सध्याचं संसद भवन (ग्राफिक्स) संसदेच्या जुन्या इमारतीची पायाभरणी 12 जानेवारी 1921 ला ड्यूक ऑफ कनॉट (Duke of Connaught) यांनी केली होती. या इमारतीचे बांधकाम 1927 मध्ये पूर्ण होऊन 18 जानेवारी 1927 ला भारताचे तत्कालीन जनरल गव्हर्नर लॉर्ड आयर्विन यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन झाले होते. इमारतीचं बांधकाम पूर्ण व्हायला सहा वर्षांचा कालावधी लागला. त्याचबरोबर त्याकाळात या इमारतीच्या बांधकामासाठी 83 लाख रुपयांचा खर्च आला होता. या इमारतीचे आर्किटेक एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर हे होते. Photo: News18 Creatives


संसदेची ही नवीन चार मजली इमारत 64,500 चौरस मीटर क्षेत्रफळात बांधण्यात येणार आहे. या नवीन सुसज्जित इमारतीमध्ये सर्व खासदारांसाठी 400 स्क्वेअर फुटाचे स्वतंत्र कार्यालय देखील असणार आहे. त्याचबरोबर या संसद भवनात सर्व डिजिटल सोयी असणार असतील. या संसद भवनात एक विशाल संविधान कक्ष असेल. शिवाय संसद सदस्यांसाठी लायब्ररी, विविध समित्यांचे कक्ष, भोजन कक्ष आणि पार्किंगची देखील सुविधा असणार आहे. जुन्या ऐतिहासिक इमारतीमध्ये संसदेशी संबंधित कार्यक्रम होतील. या इमारतीचा डायमीटर हा 560 फूट इतका आहे. त्याच्या आकारावरून या इमारतीची भव्यता तुमच्या लक्षात येईल. जुन्या इमारतीच्या सजावटीसाठी लाल रंगाचे दगड वापरण्यात आले असून या इमारतीला एकूण 12 लोखंडी गेट असणार असून कार्यक्रमावेळी ही गेट बंद ठेवण्यात येतात. नवं संसद भवन (ग्राफिक्स) टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडने(Tata Projects Limited) भारताच्या संसदेच्या इमारतीचे बांधकाम करण्याचे कंत्राट मिळवले आहे. संसदेच्या या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी अंदाजे 971 कोटी रुपये खर्च होईल. अंदाजे 21 महिन्यांमध्ये याचे काम पूर्ण होईल. नवीन संसद भवनाचं डिझाइन एचसीपी डिझाइन व प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने तयार केलं आहे. चार मजल्याच्या इमारतीचं क्षेत्रफळ 64,500 चौरस मीटर एवढे असून यात 1224 खासदार बसू शकतील. Photo: News18 Creatives


तुलना जुनं विरुद्ध नवं संसद भवन लोकसभा आसनक्षमता (ग्राफिक) या नवीन संसद भवनात सदस्यांची आसन क्षमता वाढवण्यात आली असून भविष्यातील गरज लक्षात घेऊन यामध्ये वाढ करण्यात आली आहे. संसदेच्या लोकसभा कक्षात 888 सदस्य बसू शकतात तर राज्यसभेत 384 सदस्य बसू शकतील. तर जॉईंट सेशनवेळी एकत्रित 1224 सदस्य बसू शकतील अशी व्यवस्था देखील करण्यात आली आहे. सध्या लोकसभेत 543 आणि राज्यसभेत 245 सदस्य बसू शकतात. या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या लिलावामध्ये टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडने भारताच्या संसद भवनाच्या बांधकामाचे कंत्राट मिळवले आहे. सध्या असलेल्या संसद भवनाला लागूनच सेंट्रल व्हिस्टा रीडेव्हलपमेंट प्रोजोक्ट अंतर्गत नवीन संसद भवन उभारले जाणार आहे. Photo: News18 Creatives


लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (om birla) म्हणाले संसदेची नवीन इमारत भूकंपरोधक असेल. या इमारतीच्या निर्मितीमध्ये प्रत्यक्षात 2000 लोकांचा सहभाग असेल, तर 9000 लोक अप्रत्यक्षपणे यामध्ये मदत करणार आहेत. या नवीन संसद इमारतीत 1224 सदस्य एकावेळी बसू शकणार असून सध्याच्या श्रम शक्ती भवनाच्या ठिकाणी दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची कार्यालये उभारली जाणार आहेत. राज्यसभेत 384 सदस्य बसू शकतील. त्याचबरोबर जुने संसद भवन देखील राष्ट्रीय पुरातत्त्व वारसा म्हणून जतन केलं जाणार आहे काल झालेल्या ऐतिहासिक भूमिपूजनसाठी विविध राजकीय नेत्यांना आणि मान्यवरांना आमंत्रण दिले असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली होती. काहींनी प्रत्यक्ष सहभाग घेतला तर काही व्हर्च्युअली कार्यक्रमात सहभागी झाले. कोविडच्या पार्श्वभूमीवर तशी योजना केली होती असंही बिर्ला म्हणाले. Photo: News18 Creatives तुलना जुनं विरुद्ध नवं संसद भवन राज्यसभा आसनक्षमता (ग्राफिक) सध्याच्या राज्यसभेच्या इमारतीचं क्षेत्रफळ 1232 चौरस मीटर असून आसनक्षमता 245 आहे. नव्या राज्यसभा इमारतीचं क्षेत्रफळ 3220 चौरस मीटर असेल आणि त्यात 384 खासदार बसू शकतील. नव्या इमारतीचं डिझाइन हे देशाच्या विविध भागांतील स्थापत्यशैलींच्या मिलाफातून तयार करण्यात आलं आहे.