पंतप्रधान मोदींच्या हस्ते जालियनवाला बाग मेमोरियलचं उद्घाटन, पाहा खास ठिकाणांचे PHOTOs
जालियनवाला बाग स्मृतीस्थळाचं (Jalianwala Bagh memorial) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी देशाच्या इतिहासातील महत्त्वाचे प्रसंग कायम लक्षात ठेवणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
आपल्या देशाचा इतिहास जिवंत ठेवणं, हे प्रत्येक देशाचं कर्तव्य असतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. इतिहास आपल्याला धडा शिकवतो आणि भविष्यासाठी मार्गदर्शनही करतो, असं त्यांनी म्हटलं.
2/ 7
जगाचा इतिहास आपल्याला आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता हा गुरुमंत्र असल्याचा संदेश वारंवार देत असतो, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना इतिहासाच्या पाऊलखुणा जपणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
3/ 7
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील एका महत्त्वाच्या पर्वाची माहिती या ठिकाणी लाईट अँड साऊंड शो च्या माध्यमातून दिली जाणार आहे.
4/ 7
जालियनवाला बाग हत्याकांड घडलं, त्या दिवसाचं चित्रच या लाईट अँड साऊंड शो मधून उभं केलं जाणार आहे.
5/ 7
13 एप्रिल 1919 रोजी सुमारे 1 हजार नागरिकांचा या हत्याकांडात बळी गेला होता तर शेकडो लोक जखमी झाले होते.
6/ 7
या ठिकाणी पहिल्या स्मृतीस्थळाचं उद्घाटन भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते 13 एप्रिल 1961 रोजी झालं होतं.
7/ 7
या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारनं 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.