Home » photogallery » national » PM MODI DIWALI IN NOWSHERA PM CELEBRATES DIWALI AT NOWSHERA JAMMU KASHMIR WITH ARMY MHJB

PICS: नौशेरामध्ये जवानांना मिठाई भरवून PM मोदींनी साजरी केली दिवाळी, 'भारत माता की जय'च्या घोषणांनी दुमदुमला परिसर

PM Modi Diwali in Nowshera: बदलते जग आणि युद्धाच्या बदलत्या पद्धतींनुसार भारताला आपली लष्करी क्षमता विकसित करावी लागेल, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिली आहे. जम्मू-काश्मीरमधील सीमावर्ती राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये दिवाळीनिमित्त सैनिकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सीमावर्ती भागात दळणवळण सुविधा आणि लष्कर तैनात करण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. सर्जिकल स्ट्राईकमध्ये येथील ब्रिगेडने बजावलेल्या भूमिकेचे मोदींनी कौतुक केले. जम्मू आणि काश्मीरमधील उरी सेक्टरमधील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 29 सप्टेंबर 2016 रोजी नियंत्रण रेषा ओलांडून सर्जिकल स्ट्राइक केला होता..

  • |