PHOTOS: पंतप्रधान मोदींनी केला गुजरात दौरा; तौत्केच्या नुकसानीचा घेतला आढावा
Narendra Modi Gujrat Visit: तौत्के चक्रीवादळामुळं महाराष्ट्र आणि गुजरातचं मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्रासह गुजरातमध्ये अनेक ठिकाणी झाडं आणि विजेचं खांब पडले आहेत. तर बऱ्याच घराचंही नुकसान झालं आहे.
|
1/ 7
अहमदाबाद: तौत्के चक्रीवादळामुळं महाराष्ट्र आणि गुजरातचं मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्रासह गुजरातमध्ये अनेक ठिकाणी झाडं आणि विजेचं खांब पडले आहेत. तर बऱ्याच जणांच्या घराचं नुकसान झालं आहे.
2/ 7
दुसरीकडे या वादळाचा जबरदस्त फटक शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. तर आंब्याचंही मोठं नुकसान झालं आहे.
3/ 7
काल गुजरातमध्ये 185 किमी प्रतितास इतक्या वेगानं वारं वाहिलं आहे. याचा गुजरातच्या किनारपट्टीला चांगलाचं फटका बसला आहे.
4/ 7
याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात दौरा केला आहे. तौत्के चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहाणी केली आहे. पंतप्रधान मोदी यांन गुजरात आणि दीवचा हवाई दौरा केला आहे.
5/ 7
पीएम मोदी आज सकाळी साडे नऊ वाजता दिल्लीहून रवाना झाले होते. भावनगर याठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी ऊना, दीव, जाफराबाद आणि महुवाचा हवाई दौरा केला. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी अहमदाबाद येथे आढावा बैठक देखील घेणार आहेत.
6/ 7
तौक्ते चक्रीवादळामुळे आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी जवळपास 40 हजार झाडे आणि 16,500 हून अधिक घराचं नुकसान झाल्याची माहिती दिली आहे.
7/ 7
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी देखील गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासोबत फोनवर चर्चा केली असून चक्रीवादळामुळं झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे.