कामसाठी निघाले पण काळाने घेतला जीव, भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू
पोट भरण्यासाठी कामधंदा करण्यासाठी चार पैसे मिळतील म्हणून निघालेले लोक त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचलेच नाहीत.
|
1/ 5
पोट भरण्यासाठी कामधंदा करण्यासाठी चार पैसे मिळतील म्हणून निघालेले लोक त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचलेच नाहीत. काळानं घात केला. कामावर जाऊन चार पैसे मिळवण्याचं स्वप्नही भंग झालं.
2/ 5
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात एक मोठी बातमी समोर आली आहे. पूलग्राट क्षेत्राजवळ भीषण रस्ता अपघात झाला आहे. या अपघातात सुमारे 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक व्यक्ती जखमी झाली आहे.
3/ 5
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले त्यांनी मृतदेह देखील ताब्यात घेतले आहेत.
4/ 5
मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व मजूर बिहारचे रहिवासी होते. काम शोधण्यासाठी ते बिहारहून हिमाच प्रदेशात जात असताना मिनी ट्रकला भीषण अपघात झाला आणि ट्रक खाली कोसळला. त्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
5/ 5
हे सर्व मजूर मंडी इथे पोहोचले होते. त्यांनी ठेकेदाराला फोन करून माहिती दिली. पुढच्या प्रवासासाठी ठेकेदारानं त्यांना मिनी ट्रक पाठवला. गाडी घसरून ती थेट खाली कोसळली आणि हा भीषण अपघात झाला आहे. या मिनी ट्रकमधून जात असतानाच भीषण अपघात झाला आहे.