PHOTOS: 2014पासून ते 2019पर्यंत स्वातंत्र्य दिनाचा पंतप्रधान मोदींचा असा आहे लुक
नरेंद्र मोदी यांनी 2014 साली पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतली. यानंतर लोकसभा निवडणूक 2019 मध्येही भाजपनं घवघवीत यश मिळवलं आणि पंतप्रधानपदी मोदी पुन्हा विराजमान झाले. 2014 पासून ते 2019 पर्यंत लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन साजरा करताना त्यांच्या लुकमध्ये वेगवेगळे बदल पाहायला मिळाले.

देशभरात स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा केला जात आहे. 73वा स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला आणि देशाला संबोधित केले. दरवर्षी 15 ऑगस्टच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांचा वेगवेगळ्या अंदाजातील लुक पाहायला मिळतो. यंदाही त्यांचा वेगळा अंदाज दिसून आला. 2014मध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं होतं. यावेळेस त्यांनी लाल आणि पिवळ्या रंगाची पगडी परिधान केली होती.

2014मध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं होतं. यावेळेस त्यांनी लाल आणि पिवळ्या रंगाची पगडी परिधान केली होती.

यानंतर 2015मधील स्वातंत्र्य दिनावेळी पंतप्रधान मोदींचा खास लुक पाहायला मिळाला. त्यांनी कुर्ता, पायजमासह मस्टर्ड रंगाची पगडी परिधान केली होती.

2016मध्ये पीएम मोदी यांनी लुकमध्ये पुन्हा बदल केला. यावेळेस त्यांनी पांढरा कुर्ता-पायजमासह रंगीबेरंगी पगडी परिधान केली होती. यावेळेस त्यांच्या भाषणात परराष्ट्र नीती आणि विशेषतः आपल्या शेजारी देश पाकिस्तानवर केंद्रीत होते.