

लोकसभा निवडणुकीमध्ये यापूर्वी पिवळ्या साडीतील महिला अधिकारी, नीलपरी यांची चर्चा झाली. पण, आता पश्चिम बंगालमधील मिमी चक्रवर्ती यांची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.


मिमी चक्रवर्ती यांना TMCनं जादवपूरमधून उमेदवारी दिली होती. त्या विजयी देखील झाल्या आहेत. मिमी या अभिनेत्री आहेत. यंदा त्यांचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.


मिमी चक्रवर्ती यांना 688472 मतं मिळाली. तर, त्यांच्याविरोधात असलेले भाजप उमेदवार अनुपम हजार यांना 393233 मतं मिळाली.


विरोधकांचा तब्बल 3 लाखांच्या मताधिक्यानं मिमीनं पराभव केला. प्रचारादरम्यान मिमी चक्रवर्ती यांचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.


राजकारणात येण्यापूर्वी मिमी अभिनय क्षेत्रात होत्या. पण, प्रचारादरम्यान उठवलेलं एक पाऊल देखील त्यांना भारी पडलं असत. याचवेळी त्यांचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.


हातात ग्लोज घालून मिमी लोकांना भेटत होत्या. त्यावर देखील चर्चा रंगली होती. पण, प्रचारादरम्यान त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. म्हणून त्यांनी ग्लोज घातल्याचं त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.


या व्हिडीओचा जास्त परिणाम हा मतांवर झाला नाही. कारण, देशात नरेंद्र मोदींची लाट असली तरी मिमी चक्रवर्ती या 3 लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून आल्या.


सर्वाधिक काम त्यांनी बंगाली चित्रपटांमध्ये केलं आहे. अभिनयाबद्दल त्यांना 4 अवॉर्ड मिळाले आहेत.


1989मध्ये जन्म झालेल्या मिमी चक्रवर्ती यांचा बालपणातील काही काळ हा अरूणाचलमध्ये देखील गेला आहे.