पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यातील घियाला गावात वडिलांसमान असलेल्या काकांना भाच्यानं साखळीनं बांधल्याचा लाजिरवाणा प्रकार घडला. पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यातील घियाला गावात वडिलांसमान असलेल्या काकांना भाच्यानं साखळीनं बांधल्याचा लाजिरवाणा प्रकार घडला. 65 वर्षांच्या वृद्ध काकांना भाच्याने जनावरणांसोबत बांधून मारहाण केली आहे. या वृद्ध व्यक्तीच्या शरीरावर मारहाण केल्याचे व्रणही उठले आहेत. गावाचे सरपंच प्रवीण कुमार यांनी स्थानिकांच्या मदतीनं या वृद्धाची सुटका केली आहे. सध्या हे प्रकरण गावच्या सरपंचांच्या वतीने मानवाधिकार्यांसमोर लेखी दिले असून वृद्धा व्यक्तीला न्याय मिळावा अशी मागणी केली जात आहे. मानवाधिकार प्रमुख राजा जुल्का यांनीही वृद्धाला न्याय देण्याचे आणि आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.