

कोरोना व्हायरसमुळे शाळेला सुट्टी देण्यात आली आहे. या संसर्गजन्य आजारामुळे आधीच विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होती मात्र आता या शाळेलाच सुट्टी देण्यात आली आहे.


याचं कारण म्हणजे एका विद्यार्थ्याच्या पालकांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान समोर आलं आहे. हे निदान होण्याआधी त्याने आपल्या मुलाची बर्थडे पार्टी ठेवली होती.


या बर्थडे पार्टीला अनेक विद्यार्थी उपस्थित होते. या पार्टीनंतर बर्थडे बॉयच्या पालकांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.


या कोरोना पीडित पालकांच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली की नाही हे रिपोर्टनंतरच कळण्यासाठी त्यांचे रक्त तपासणीला देण्यात आले आहे.


या संपूर्ण घटनेमुळे नोएडामध्ये खळबळ उडाली असून भीतीनं शाळाचं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Demo Pic)


कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. तर शाळेतील संसर्ग घालवण्यासाठी आरोग्य विभागाने एक मोहीम सुरू केली आहे.


दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णाची केस पहिल्यांदा 2 मार्चला समोर आली होती. कोरोना बाधित रुग्ण हा इटलीतून आला होता.