Home » photogallery » national » NO CORONAVIRUS FEAR AT BJP ELECTION RALLY IN TELANGANA LOCAL BODY ELECTION BJP PRESIDENT RALLY PHOTO
कुठे आहे कोरोना? इथे फक्त निवडणुकांचे वारे, पाहा भाजप अध्यक्षांच्या रॅलीचे PHOTO
हा फोटो बंगालमधला नाही. तिथल्या प्रचाराचा धुरळा संपला, पण कोरोनाव्हायरसचा प्रकोप वाढायला सुरुवात झालेल्या तेलंगणातले (Telangana Election Rally) हे फोटो पाहा.. लॉकडाउन, सोशल डिस्टन्सिंग सगळं पायदळी तुडवलंय इथे. काय म्हणाल यावर?
|
1/ 9
कोरोनामुळे एकीकडे मृत्यूचं तांडव सुरू आहे. देशभरात चिंतेचं वातावरण आहे. कडक लॉकडाऊनही अनेक राज्यांमध्ये सुरू आहे. पण जरा हे चित्र पाहा.
2/ 9
भाजपच्या प्रचार रॅलीचे हे फोटो आहेत. तेलंगणच्या भाजप अध्यक्षांचीच प्रचारसभा वारंगळमध्ये होती. तिथले हे फोटो पक्षाच्या अधिकृत हँडलवरून ट्वीट करण्यात आले आहेत.
3/ 9
तेलंगणमध्ये वारंगळ आणि खम्मम महापालिकेच्या 248 वॉर्डांमध्ये 30 एप्रिलला मददान होत आहे. त्याबरोबर आणखीही काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याच दिवशी आहेत.
4/ 9
गेल्या काही दिवसात तेलंगणामध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. दररोज 8000 च्या वर नवे रुग्ण सापडत आहेत.
5/ 9
तिथल्या डॉक्टरांनीसुद्धा लोकांच्या जिवापेक्षा निवडणुका महत्त्वाच्या आहेत का असं विचारत चिंता व्यक्त केली होती.
6/ 9
मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पायदळी तुडवून या प्रचारसभा होत आहेत.
7/ 9
इथे राजकीय पक्षांना मात्र त्याची काही पर्वा दिसत नाही. भाजपचे तेलंगण अध्यक्ष बंडी संजय कुमार यांनीच ही प्रचारसभा घेतली. त्यासाठी एवढा जनसमुदाय होता.
8/ 9
लोकांच्या जिवापेक्षा निवडणूक आणि प्रचार महत्त्वाचा वाटतो आहे. यातले काही फोटो भाजपनेच ट्वीट केले आहेत.
9/ 9
बंगालमध्ये तर प्रचाराचा धुरळा संपला अजून तेलंगणात जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. कालच सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनलाच लोकांच्या जीवाबद्दल जबाबदार धरणारं वक्तव्य केलं होतं.