कोरोना बाधित कुटुंबांना मोठा दिलासा, अभ्यासात आढळून आले नवे निष्कर्ष
बाधित सदस्यांमुळे लहान मुलांमध्ये कोरोना पसरण्याचं प्रमाण कमी असून वृद्ध लोकांना जास्त भीती आहे असंही या अहवालात म्हटलं आहे.
|
1/ 11
कोरोना व्हायरसने देशात सध्या थैमान घातलं आहे. यावर औषध निघालेलं नाही मात्र कोरोनाविषयी महत्त्वाचं संशोधन होत असून भारतही त्यात अग्रेसर आहे.
2/ 11
अहमदाबादमधल्या Indian Institute of Public Healthने केलेल्या अभ्यासात अनेक महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
3/ 11
कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला जर कोरोना झाला तर इतर सदस्यांनाही बाधा होते असा आत्तापर्यंतचा समज होता. मात्र या समजांना या शोधाने धक्का दिला आहे.
4/ 11
कुटुंबातला एखादा सदस्य जर COVID-19 पॉझिटिव्ह आढळला तर घरातले सर्वच सदस्य बाधित होतीलच असे नाही असं या अभ्यासात आढळून आलं आहे.
5/ 11
अशा परिस्थितीत घरातल्या 80 ते 90 टक्के लोकांना व्हायरसची बाधा होत नाही असं आढळून आल्याचं संस्थेचे संचालक डॉ. दिलीप मावळंकर यांनी म्हटलं आहे.
6/ 11
अशा परिस्थितीत घरातल्या इतर लोकांमध्ये प्रतिकारशक्ती resistance or immunity तयार होत असल्याचं या शोधात आढळून आलं आहे.
7/ 11
संस्थेचा अभ्यास आणि या विषयांवर जगात प्रकाशित झालेले 13 रिपोर्ट्स यांचा आढाला घेऊन संस्थेने हा अहवाल तयार केला आहे.
8/ 11
कोविडमुळे घरातल्या एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला मात्र इतर कुणालाही बाधा झाली नाही अशीही उदाहरणे असल्याचं मावळंकर यांनी सांगितलं आहे.
9/ 11
कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला कोविडची बाधा झाली तर इतरांना बाधा होण्याची शक्यता ही फक्त 10 ते 15 टक्के एवढीच असते.
10/ 11
ज्या कुटुंबात पत्नी किंवा पत्नीला इन्फेक्शन झाल्यावरही दुसऱ्याचा त्याची बाधा होत नसल्याचं 45 ते 65 टक्के घटनांमध्ये आढळल्याची माहितीही या अहवालात देण्यात आली आहे.
11/ 11
बाधित सदस्यांमुळे लहान मुलांमध्ये कोरोना पसरण्याचं प्रमाण कमी असून वृद्ध लोकांना जास्त भीती आहे असंही या अहवालात म्हटलं आहे.