केंद्र सरकारच्या नवीन शेतकरी विधेयकावरून (New Agriculture Bill) पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. हे नवीन शेतकरी विधेयक मागे घेण्याची मागणी हे शेतकरी करत आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. या आंदोलनाबरोबरच सोशल मीडियावरून देखील यासंदर्भात चुकीची माहिती पसरवली जात आहे. सरकारने यामधील काही चुकीच्या गोष्टींवर खुलासा केला आहे. (फोटो सौजन्य - PTI)