

एकीकडे भारत आणि नेपाळ दरम्यान तणावपूर्ण वातावरण असताना, दुसरीकडे कोरोना काळात नेपाळमध्ये बनावटरित्या भारतीय आधार कार्ड बनवण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. भारतात प्रवेश करण्यासाठी बुधवारी बनबसा सीमेवर नेपाळी नागरिकांची लांबच लांब रांग लागली होती.


याप्रकरणी टनकपूरचे एसडीएम ऑफिसर हिमांशु कफाल्टिया यांनी सांगितलं की, बनबसा सीमेवरून भारतात येण्यासाठी अनेक नेपाळी नागरिक भारतीय आधार कार्ड तयार करत असून यामुळे सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.


हिमांशु कफाल्टिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अधिकतर नेपाळी लोकांच्या आधार कार्ड सुरक्षिततेचा विषय समोर आला आहे. यापूर्वीही इतर अधिकाऱ्यांकडे हा मुद्दा मांडण्यात आला आहे.


तपासणी दरम्यान, नेपाळमधून भारतात प्रवेश करणाऱ्या सर्व लोकांच्या ओळख पत्रासह, आवश्यक माहिती पाहिली जात आहे. त्याशिवाय हे नेपाळी लोक भारतात कुठे आणि कोणतं काम करतात याचीही चौकशी केली जात आहे. तसंच कोणत्या ठेकेदाराने त्यांचं आधार कार्ड बनवलं याचाही तपास घेतला जात आहे.