या किल्ल्याबाबत आतापर्यंत अनेक अफवा पसरल्या आहेत. या किल्ल्याच्या भिंतीला एका माणसाने लोखंड लावलं आणि त्याचं सोनं झालं, ही अफवा गेल्या अनेक वर्षांपासून या भागात प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेकजण आपल्याला हा दगड मिळावा, या मोहापायी इथल्या भिंतीतील दगड पळवून नेत असल्याचं चित्र आहे.