अशी दिसेल मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन : जपानने पहिल्यांदाच रीलिज केले PHOTO
Mumbai-Ahmedabad Bullet Train: भारत सरकारने पाच वर्षांपूर्वी 508 किलोमीटर लांबीच्या मुंबई – अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडारला मंजुरी दिली होती. या अंतर्गत मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुरू आहे. जपान यासाठी सहकार्य करीत आहे. याच अनुषंगाने जपान दूतावासाने नुकतेच या बुलटे ट्रेनचे काही फोटो शेअर केले आहेत.


भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला (Bullet Train Projects) गती मिळताना दिसत आहे. नुकतीच भारतात जपानी दुतावासाने बुलेट ट्रेन ई 5 सिरीज शिंकनसेन (E5 Series Shinkansen) चे फोटो प्रसिध्द केले आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई ते अहमदाबाद हे अंतर केवळ 2 तास पूर्ण करता येणार आहे. भारत सरकारने पाच वर्षांपूर्वी 508 किलोमीटर लांबीच्या मुंबई – अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरला (Mumbai-Ahmadabad High Speed Railway Coridor) मंजुरी दिली होती. ( फोटो क्रेडीट : इस्ट जपान रेल्वे कंपनी)


शुक्रवारी भारतातील जपानी दूतावासाने याबाबतचे फोटो शेअर केले आहेत. या ट्रेनमध्ये काही बदल केले जाणार आहेत. जेणेकरुन त्याचा उपयोग मुंबई- अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पात रोलिंग स्टॉक म्हणजेच रेल्वेत वापरल्या जाणाऱ्या गाड्या आणि वॅगन्स म्हणून करता येईल. यामुळे भारतीय रेल्वे प्रणाली अधिक गती मिळणार आहे. ( फोटो क्रेडीट : इस्ट जपान रेल्वे कंपनी)


सुरवातीला गुजरातमध्ये या प्रकल्पाला वेग आला होता. मात्र जमिनींबाबतच्या प्रश्नांमुळे महाराष्ट्रातील काम संथ गतीने झाले. 1.08 कोटी रुपये प्रस्तावित किंमत असलेला प्रकल्प प्राथमिक स्थितीतच विलंबाने सुरु झाला होता. राजकीय मतभेदांमुळे देखील या प्रकल्पाच्या कामांवर परिणाम होऊ शकतो. ( फोटो क्रेडीट : इस्ट जपान रेल्वे कंपनी)


या प्रकल्पातंर्गत भारतीय ठेकेदारांमार्फत पूल आणि बोगदे तयार करण्याचे काम सुरु असल्याचे काही दिवसांपूर्वी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ व्ही. के. यादव यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच सिग्नल, टेलिकॅाम आणि रोलिंग स्टॉकची कामे जपानी कंपन्या करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं होतं. 2018 मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे म्हटले होते, की भारतातील बुलेट ट्रेनची योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जपान कटिबद्ध आहे. ( फोटो क्रेडीट : इस्ट जपान रेल्वे कंपनी)


1 डिसेंबरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ व्ही.के. यादव यांनी या प्रकल्पाच्या कामांच्या गतीबाबत विश्वास व्यक्त केला होता. येत्या 4 महिन्यात महाराष्ट्रात 80 टक्के जमिन अधिग्रहण पूर्ण होईल. आतापर्यंत राज्यात 22 टक्के जमिनींचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. इकॅानॅामिक टाईम्सच्या वृत्तानुसार, मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपान 0.1 टक्के व्याजदराने 79 हजार कोटींचे कर्ज देत 80 टक्के निधी पुरवठा करणार आहे.या कर्जाची संपूर्ण मुदत 50 वर्ष असेल तर मॉरेटेरियम कालावधी 15 वर्षे आहे.