

वाराणसीमध्ये असं एक घर आहे जिथे लोक वाट पाहतात ती मृत्यूची. 1908 पासून हे मुक्ती भवन म्हणून ओळखलं जातं. इथे एका वहीत आत प्रवेश घेणाऱ्यांची नावं आहेत. ते लोक आता या जगात नाहीत.


हिंदू धर्मावर आस्था असणारे जगभरातले लोक इथे शेवटच्या दिवसात येतात. या भवनात 12 खोल्या आहेत. तिथे मंदिर आणि पुजारीही असतो. जे लोक मृत्यूच्या जवळ आहेत, त्यांनाच इथे प्रवेश मिळतो. दोन आठवडे राहण्याची परवानगी मिळते.


इथे रोज 75 रुपये द्यावे लागतात. जास्त पैसे मिळाले तर मोक्ष आणि ईश्वराचं संगीत ऐकवायला गायक असतो.


रोजच्या 75 रुपयांत झोपण्यासाठी गादी, चादर,उशी दिली जाते. पिण्यासाठी पाण्याचा माठ असतो. आत येणाऱ्या व्यक्तींनी कमीत कमी सामान घेऊन आत यायचं असतं.


इकडचे पुजारी सकाळ आणि संध्याकाळ आरतीनंतर अंगावर गंगाजल शिंपडतात, म्हणजे मुक्ती मिळू शकेल, अशी भावना असते.


दोन आठवडे मुक्ती भवनात राहिल्यानंतर मृत्यू झाला नाही, तर मुक्ती भवन सोडावं लागतं. मग त्या व्यक्तीला वाराणसीतच बाहेर हाॅटेल किंवा धर्मशाळेत ठेवलं जातं. म्हणजे मृत्यू वाराणसीतच व्हावा.