मध्य प्रदेशातील बैतूलमधील मुलताई तालुक्यातील कन्या शाळेच्या समोरील हे दृश्य आहे. येथे एक वयस्कर व्यक्ती रस्त्याच्या शेजारी फेकलेल्या कचऱ्यातून काहीतरी खायला शोधत होता. यादरम्यान तेथून जाणाऱ्या शेतकऱ्याने हा प्रकार पाहिला.
2/ 4
ही वयस्कर व्यक्ती कचऱ्यात सांडलेलं शिळं अन्न तेथेच बसून खात होती. हे पाहून शेतकरी स्तब्ध झाला. शेतकऱ्याने त्याला रोखलं आणि आपल्याकडे बोलावलं.
3/ 4
त्याच्याशी बातचीत केल्यानंतर कळालं की, ती व्यक्ती तमिळनाडू येथे राहणारी आहे. त्याला हिंदी बोलता येत नाही. शेतकऱी त्या व्यक्तीला आपल्यासोबत हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि त्याला पोटभर जेवू घातलं आणि काही पैसेही दिले.
4/ 4
वयस्कर व्यक्तीला चेन्नईला जायचं आहे. ती कुठून आली, कशी आली याबाबत मात्र फारसं काही कळू शखलं नाही. आजही आपल्या देशात गरीब व्यक्तीला दोन वेळचं जेवणं आणि डोक्यावर छत मिळणं अवघड झालं आहे.