नाकात नळी घातलेली असतानाही पर्रिकरांनी सादर केलं गोव्याचं बजेट; आणि म्हणाले...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोव्याच्या विधानसभेत जोरदार पुनरागमन करत बजेट सादर केलं. नाकाला नळी (राईस ट्यूब) लावलेल्या अवस्थेत त्यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि नंतर ते म्हणाले, मी चांगला जोशात आहे'


गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोव्याच्या विधानसभेत जोरदार पुनरागमन करत बजेट सादर केलं. नाकाला नळी (राईस ट्यूब) लावलेल्या अवस्थेत त्यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि नंतर ते म्हणाले, मी चांगला जोशात आहे'


भाजपचे ज्येष्ठ नेते मनोहर पर्रिकर गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. पर्रिकर गेले काही महिन्यांपासून आजारांवर उपचार घेत आहेत. अनेक दिवसांनी ते विधानसभेत परतले.


दोन दिवसांपूर्वीच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी येऊन गेले. राफेलवरून या माजी संरक्षण मंत्र्यांबरोबरच्या भेटीचा विषय चर्चिला गेला.


राहुल यांच्याबरोबर राफेलविषयी कुठलीही चर्चा झाली नाही, ते खोटं बोलत आहेत, असं मनोहर पर्रिकर यांनी पत्र लिहून स्पष्ट केलं.


विचारपूस करायला आलेल्या भेटीचं राजकारण करू नका, असा स्पष्ट खुलासा करत पर्रिकरांनी राहुल गांधींवर लेटर बाँब फोडला.


राहुल गांधींनी अत्यंत खालच्या पातळीवरच्या राजकारणाचं प्रदर्शन केलं, अशी टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीसुद्धा केली.


या सगळ्या चर्चांदरम्यान मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी गोव्याचं बजेट सादर केलं. तेव्हाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगला शेअर झाला.


आजारी असलो तरी मी अजून जोशात आहे. 'मुझमे काफी जोश है और मैं पूरी तरह होश में हूं', असं त्यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सांगितलं.


"आज मी पुन्हा एकदा संपूर्ण निष्ठा, समर्पण आणि प्रामाणिकपणे वचन देतो की शेवटच्या श्वासापर्यंत मी गोव्याची सेवा करत राहीन", असं भावपूर्ण आश्वासनही त्यांनी बजेटनंतर बोलताना दिलं.