

मनोहर पर्रिकर एक हुषार राजकारणी, प्रभावी नेते होतेच पण माणूस म्हणूनही त्यांची उंची खूप मोठी होती. पत्नीच्या अकाली निधनानंतर त्यांनी दोन्ही मुलांना जबाबदारीनं वाढवलं.


मनोहर पर्रिकर त्यांच्या साध्या राहणीसाठी कायम ओळखले जातील. ते स्वतः आयआयटीमधून इंजिनिअर झाले होते. मुलांनी राजकारणात यावं असा आग्रह न धरता त्यांनी उत्पल आणि अभिजिन या दोन्ही मुलांना करिअर निवडीचं स्वातंत्र्य दिलं.


पर्रिकरांची दोन्ही मुलं राजकारणापासून दूर आहेत. वडिलांनी त्यांच्यावर करिअर निवडीचा कुठलाही दबाव आणला नाही. दोन्ही मुलं उच्चशिक्षित असून गोव्यात व्यवसाय करतात.


मनोहर पर्रिकर यांनी काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकातल्या लेखात आपल्या दिवंगत पत्नीविषयी खूप भावुक होऊन लिहिलं होतं. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून पर्रिकरांनी प्रथम शपथ घेतली त्या वेळी पत्नी मेधा पर्रिकर ते बघायला नव्हती, यांचं दुःख त्यांच्या आयुष्यात नेहमीच राहिलं.


मनोहर पर्रिकरांचा मोठा मुलगा उत्पल वडिलांसारखाच इंजिनिअर आहे. त्याने अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातून उच्चशिक्षण घेतलं आहे.


उत्पलची पत्नी उमासुद्धा अमेरिकेत उच्चशिक्षण घेतलेली आहे. ते दोघं गोव्यात व्यवसाय करतात. त्यांना एक मुलगा असून त्याचं नाव ध्रुव आहे.


उत्पल गेल्या काही दिवसांत वडिलांबरोबर जास्त दिसला. पण तरीही राजकारणात यायची इच्छा उत्पल यांनी बोलून दाखवलेली नाही.


मनोहर पर्रिकरांच्या आरोग्यासाठी त्यांनी मंदिरांना भेटी दिल्याचे फोटे माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. पण स्वतः पर्रिकर कुटुंबाने कधीही याचा गवगवा केला नाही.


अभिजित पर्रिकर या दुसऱ्या मुलानेही राजकारणापासून दूर राहणंच पसंत केलं. अभिजितही भावाप्रमाणे व्यवसाय करतात.