

Swiggy किंवा इतर फूड डिलिव्हरी अॅप लोकांना घरापर्यंत जेवन उपलब्ध करून देतात. देशातल्या सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये ऑनलाईन फूड डिलिव्हरीचं प्रमाण वाढत आहे. यावेळी Swiggy या फूड डिलिव्हरी कंपनीने अशी काही चूक केली की ते सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाले आहेत.


अनेक वेळा जेवणाचा दर्जा किंवा डिलिव्हरी ऑर्डरवरून अनेक तक्रारी येतात. पण यावेळी Swiggy एक भन्नाट चुकीमुळे चर्चेत आली आहे. तिच्या या चुकीमुळे नेटकऱ्यांनी त्यांची भारी गम्मतच केली आहे.


ते झालं असं की, बंगळुरूच्या एका यूजरने Swiggyवरून जेवन ऑर्डर केलं. जेवणाचं स्टेटस पाहिल्यानंतर यूजर तर थक्क झालाच पण तुम्हीही पाहातच रहाल.


जेवण हे बंगळुरूमधून ऑर्डर करण्यात आलं होतं पण स्टेटसमध्ये ते जेवण राजस्थानच्या एका रेस्टॉरंटमधून डिलीव्हर होत असल्याचं दिसलं.


ट्विटरवर भार्गव राजन नावाच्या एक व्यक्तीने Swiggyच्या स्टेटस वाला गूगल मॅमचा फोटो शेअर केला आहे.


खरंतर, भार्गव राजनने बंगळुरूमध्ये Swiggy च्या माध्यमातून जेवण ऑर्डर केलं होतं. फूड ऑर्डर 138 रुपयांची होती. पण Swiggy ने मैलो दूर असलेल्या राजस्थानमधून ऑर्डर बुक केली आणि Swiggy मॅममध्ये ती 12 मिनिटांत डिलिव्हर होणार असं दाखवलं.


हे सगळं पाहून भार्गव थक्क झाले. त्यांनी त्याचा स्क्रिनशॉट काढला आणि ट्विटरवर शेअर केला. हा फोटो शेअर करताना त्यांनी Swiggy लाही टॅग केलं आहे.