15 August: लाल चौक ते लाल किल्ला, मेजर श्वेता पांडेय करणार PM मोदींना ध्वजारोहणासाठी मदत!
मॉस्कोच्या लाल चौकातली परेड ते दिल्लीच्या लाल किल्ल्यावरचा 15 ऑगस्टचा मुख्य कार्यक्रम हा त्यांचा मोठा प्रवास आहे.
|
1/ 7
देशभर कोरोनाचा साथ असल्याने यावर्षीचा स्वातंत्र्य दिवस अनेक अर्थाने खास आहे. अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून पंतप्रधानांना ध्वजारोहणासाठी मदत करण्याचा मान मेजर श्वेता पांडेय यांना मिळाला आहे.
2/ 7
मेजर पांडेय यांना रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये झालेल्या भव्य परेडमध्ये भारतीय पथकाचं नेतृत्व करण्याचा मान मिळाला होता.
3/ 7
या परेडमध्ये भारताचा राष्ट्रध्वज घेऊन त्यांनी नेतृत्व केलं होतं.
4/ 7
2012 मध्ये त्यांनी लष्करात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं.
5/ 7
मॉस्कोच्या लाल चौकातली परेड ते दिल्लीच्या लाल किल्ल्यावरचा 15 ऑगस्टचा मुख्य कार्यक्रम हा त्यांचा मोठा प्रवास आहे.
6/ 7
लाल किल्ल्यावर गार्ड ऑफ ऑनर देणारे सर्व जवान गेल्या काही दिवसांपासून क्वारंटाइनमध्येच राहित होते.
7/ 7
तर गार्ड ऑफ ऑनरचं नेतृत्व कर्नल गौरव एस. येवॉल्कर हे करणार आहेत.