

बऱ्याचदा जे आपल्या समोर घडतं त्यापेक्षा प्रत्यक्षात आणखीन काही वेगळं सत्य असतं याचं उत्तम उदाहरण मध्य प्रदेशातल्या एका घटनेतून समोर आलं आहे.


15 वर्षांपूर्वी भिकारी म्हणून लोक ज्या व्यक्तीला ओळखत होते प्रत्यक्षात ते एक शार्प शूटर आणि पोलीस अधिकारी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. 15 वर्षांपासून रस्त्यावर भिक मागणारा एक व्यक्ती सर्वात मोठा पोलीस अधिकारी असल्याची माहिती मिळाली आहे.


मानसिक संतुलन बिघडल्यानं 15 वर्षांपूर्वी हा पोलीस अधिकारी बेपत्ता झाले होते. ग्वाल्हेरच्या रस्त्यावर फिरत होते. पण याची कोणालाही माहिती देखील नव्हती. मंगळवारी रात्री जेव्हा पोलिसांचं पेट्रोलिंग सुरू होतं. त्यादरम्यान एक भिकारी कुडकुडताना दिसला आणि त्याला मदत करण्यासाठी जेव्हा पोलीस त्याच्या जवळ गेले तेव्हा त्यांना धक्का बसला.


मनीष मिश्रा असं या निराधार मनोरुग्ण व्यक्तीचं नाव. ते गेली 15 वर्षं अशाच अवस्थेत हिंडत आहेत. 1999 सालच्या बॅचचे ते पोलीस अधिकारी होते आणि त्या वेळी अचूक नेम साधणारा निशाणेबाज म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी मध्य प्रदेशात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी म्हणून काम केलं. पण 2005 च्या सुमारास त्यांना मानसिक त्रास सुरू झाला. या आजाराने त्यांची मानसिक स्थिती बिघडली.


मनीष मिश्रा यांच्यावर उपचार देखील करण्यात आले होते. मात्र मनोरुग्णालयातून ते पळून गेले आणि त्यांची मानसिक स्थिती आणखीन खालावली.