

लोकसभा निवडणूक घोषित झाल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये एकच गडबड सुरू झालीय. यावेळी सरकार तृतीयपंथींबद्दल गंभीर असल्याचं जाणवतंय. त्यामुळे उत्तर प्रदेशमधून निवडणुकीसाठी 5 तृतीयपंथी उमेदवार उभे आहेत.


इलाहाबादमधून किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर भवानी नाथ वाल्मीकि (भवानी मां) यांना तिकीट दिलंय. यावेळी कुंभमेळ्यात किन्नरांचा वेगळा आखाडा होता. त्यात भवानी माँची चर्चा होती.


नुकत्याच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या किन्नर गुलशन बिंदूंवर प्रियांका गांधींचा प्रभाव आहे. 2012च्या निवडणुकीत त्या अपक्ष म्हणून उभ्या राहिल्या होत्या. त्या जिंकल्या नाहीत पण त्यांनी 20 हजार मतं मिळवली आणि भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांच्या पराजयाचं कारण बनल्या.


उत्तर प्रदेशच्या दबंग किन्नर आशादेवी लोकप्रिय आहेत. 2001मध्ये गोरखपूरच्या पालिका निवडणुकीत आशादेवी उर्फ अमरनाथ जिंकल्या होत्या. अपक्ष आशादेवींनी सपाच्या अंजू चौधरींचा 60 हजार मतांनी पराभव केला.


2002च्या विधानसभा निवडणुकीत किन्नर पायलनं लखनौच्या पश्चिम भागात उभ्या असलेल्या भाजपच्या लालजी टंडनना जोरदार टक्कर दिली होती.