चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या मुहुर्तावर देशातील वेगवेगळ्या भागात सण-उत्सव साजरे केले जात आहेत. जम्मू काश्मीरमध्ये हा दिवस नवरेह म्हणून साजरा करतात. या सणाच्या शुभेच्छा देताना प्रियांका गांधींनी नवरोजच्या शुभेच्छा दिल्या. हा सण पारसी लोकांचा आहे. यानंतर प्रियांका गांधींना ट्रोल केलं जात आहे.
2/ 5
काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे की, माझ्या सर्व काश्मीरी बंधु-भगिनींनो तुम्हाला नवरोजच्या शुभेच्छा. नवरोज हा पारसी समाजातील लोकांचा सण आहे.
3/ 5
अशोक पंडित नावाच्या एका युजरने म्हटलं आहे की, नवरोज हा इराणी लोकांचा सण आहे. तो गेल्याच महिन्यात झाला. आम्ही काश्मीरी पंडीत त्याला नवरेह म्हणून साजरा करतो.
4/ 5
प्रसिद्ध लेखक आणि टीकाकार तारेक फतेह यांनी म्हटले की, प्रिय प्रियांका गांधी, नवरोज गेल्याच महिन्यात साजरा झाला. काश्मीरमध्ये नववर्षानिमित्त नवरोह सण साजरा केला जातो.
5/ 5
नवरोज हा इराणी लोकांचा सण आहे. तो 21 मार्चला साजरा करतात. तुम्हाला नवरेहच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत का? असं एका युजरने म्हटलं आहे.