वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर मोदी त्सुनामी, अशी घेतली दखल
लोकसभेच्या निकालाची वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर वेगवेगळ्या प्रकारे कशी दखल घेतली ते पाहण्यासारखं आहे.
|
1/ 12
2019 च्या लोकसभेत मोदी त्सुनामीत काँग्रेससह इतर पक्षांची धूळदाण उडाली. देशातील या मोठ्या घडामोडीचं वार्तांकन करताना वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर वेगवेगळ्या प्रकारे कशी दखल घेतली ते पाहण्यासारखं आहे.
2/ 12
2014 मध्ये 282 जागा जिंकणाऱ्या भाजपने यावेळी 300 च्या वर जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आहे.
3/ 12
मोदी लाटेत 2014 ला काँग्रेसला फक्त 44 जिंकता आल्या होत्या. यावेळी मोदी त्सुनामीतही काँग्रेसची पुरती वाताहत झाली असली तरी 2014 च्या तुलनेत 8 जागा अधिक जिंकल्या.
4/ 12
काँग्रेसने गेल्या लोकसभेपेक्षा 8 जागा अधिक जिंकल्या असल्या तरी त्यांच्या दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
5/ 12
एनडीएतील दोन नंबरचा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या पहिल्या पानावरही कमळ फुललं. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
6/ 12
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठीतून पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपच्या स्मृती ईराणींनी या ठिकाणी राहुल गांधींना पराभूत केलं.
7/ 12
8/ 12
लोकसत्ताने पहिल्या पानावर 'मोदीच!' या एका शब्दात हेडलाईन दिली आहे.
9/ 12
भाजपच्या संसदीय समितीची शनिवारी बैठक होणार असून त्यात मोदींची पंतप्रधानपदी निवड केली जाईल. तसेच सत्तास्थापनेसाठी राष्ट्रपतींची भेट घेतील.
10/ 12
2014 ची मोदी लाट ओसरली असा सूर विरोधकांनी लावला होता पण येणाऱ्या त्सुनामीची कल्पनाच त्यांना नव्हती हे लोकसभेच्या निकालानंतर दिसून आलं.
11/ 12
12/ 12
टेलिग्राफने मोदींनी शेवटच्या क्षणी घेतलेल्या पत्रकार परिषदेची बातमी देताना पहिल्या पानावर त्यासाठी जागा रिकामी ठेवली होती. आता त्यांच्या विजयानंतर पुन्हा मोदी इतकंच लिहलं आहे.